कोसला

भालचंद्र नेमाडे · कादंबरी

खानदेशातल्या गावातून पुण्याला शिकायला आलेल्या पांडुरंग सांगवीकरची गोष्ट — कॉलेज, होस्टेल, मित्र, अपयश आणि 'आपण नेमकं काय करतोय?' हा प्रश्न.

पुस्तक कशाबद्दल?

पांडुरंग सांगवीकर स्वतःची गोष्ट सांगतो — गावातलं बालपण, पुण्यातलं कॉलेज, होस्टेलमधली मैत्री, संमेलनं आणि उचापती, आणि मग घरच्या संकटांनी हादरून गेलेलं मन.

'कोसला' म्हणजे कोश — रेशमाच्या किड्याचा. आपणच आपल्याभोवती विणलेल्या कोशात अडकलेला तरुण, हे या नावामागचं सूचन.

का वाचावं?

ही कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा तिने मराठी कादंबरीची भाषा आणि रचनाच बदलली. बोलकी, उपरोधिक, कधी गमतीशीर, कधी अतिशय उदास — अगदी तरुण माणसाच्या मनासारखी.

नेमाडेंनी ती पंचविशीत लिहिली. आजही कॉलेजमधल्या प्रत्येक पिढीला सांगवीकर आपल्यातलाच वाटतो.

लेखकाविषयी

भालचंद्र नेमाडे — कादंबरीकार, कवी, समीक्षक आणि इंग्रजीचे प्राध्यापक. 'हिंदू — जगण्याची समृद्ध अडगळ' ही त्यांची मोठी कादंबरी. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

कोणासाठी

सोळा वर्षांपुढे — कॉलेजच्या वयात नक्की