तुकाराम गाथा

संत तुकाराम · संतसाहित्य

तुकोबांच्या हजारो अभंगांचा संग्रह — भक्ती, समाजावरचे फटकारे, निसर्गप्रेम आणि जगण्याचं शहाणपण. मराठी माणसाच्या ओठांवर पिढ्यानपिढ्या असलेले शब्द.

ग्रंथ कशाबद्दल?

गाथेत तुकारामांचे साडेचार हजारांहून अधिक अभंग आहेत. काही विठ्ठलाशी प्रेमाचा, रुसव्याचा संवाद आहेत; काही ढोंगी लोकांवर थेट प्रहार; तर काही अगदी साध्या शब्दांत खोल तत्त्वज्ञान.

इंद्रायणीत बुडवलेल्या वह्यांची आख्यायिका प्रसिद्ध आहे; पण हे अभंग खरे टिकले ते लोकांच्या मुखी. तुकारामांचे समकालीन संताजी जगनाडे यांनी ते लिहून ठेवले, असं सांगितलं जातं.

का वाचावं?

आज मराठीत वापरल्या जाणाऱ्या अनेक म्हणी आणि वाक्प्रचार तुकारामांच्या अभंगांतून आले आहेत. गाथा वाचली की मराठी भाषेची मुळं कळतात.

प्रत्येक अभंग छोटा आहे — रोज एक वाचायला, पाठ करायला सोपा.

वाचताना

आपल्या साइटवरच्या 'संत तुकाराम' परिचय पानावरचा अभंग आधी पाठ करा, मग गाथेत तो शोधा आणि त्याच्या आजूबाजूचे अभंग वाचा.

कोणासाठी

सगळ्यांसाठी