उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
लोहगड आणि शेजारचा विसापूर हे जोडकिल्ले लोणावळ्याजवळ आहेत. पुरंदरच्या तहात लोहगड मुघलांकडे गेला आणि १६७० मध्ये मराठ्यांनी तो परत जिंकला. पुढे पेशवाईत नाना फडणवीसांनी इथे काही काळ खजिना आणि मुक्काम ठेवला होता.
गडावर जाताना गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे चार दरवाजे लागतात. वर लक्ष्मी कोठी, शिवमंदिर, सोळा कोनी तलाव आणि विंचवाच्या नांगीसारखी पसरलेली 'विंचूकाटा' माची आहे.
चढाई सोपी आणि पायऱ्या नीट बांधलेल्या असल्याने पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्यांसाठी आणि मुलांसोबत जाण्यासाठी हा उत्तम किल्ला. पायथ्याजवळ भाजे आणि बेडसे येथील प्राचीन बौद्ध लेण्या आहेत.
लोणावळ्याजवळचा हा किल्ला चढायला तुलनेने सोपा असल्याने कुटुंबांसाठी उत्तम आहे. विंचवाच्या नांगीसारखी पसरलेली 'विंचूकाटा' माची इथलं आकर्षण. पावसाळ्यात धुक्यात हरवलेला लोहगड पाहण्यासारखा असतो.
कसं जायचं
लोणावळ्याहून सुमारे १५ किमी; मळवली रेल्वे स्टेशनवरून चालत किंवा लोहगडवाडीपर्यंत गाडीने. वाडीपासून ३०-४५ मिनिटांची चढाई.
उत्तम काळ
जून ते फेब्रुवारी; पावसाळ्यात सर्वांत सुंदर
टीप
पावसाळ्यातल्या शनिवार-रविवारी अतिशय गर्दी असते — आठवड्याचा दिवस निवडा. भाजे लेणी आणि लोहगड एका सकाळी सहज होतात.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.