विशाळगड

कोल्हापूर · गिरिदुर्ग · चढाई: सोपा

बाजीप्रभूंनी खिंड लढवली आणि महाराज सुखरूप इथे पोहोचले — पावनखिंडीची गाथा.

कोल्हापूर जिल्ह्यातला हा किल्ला पावनखिंडीच्या गाथेशी जोडलेला आहे. पन्हाळ्यावरून निघालेले महाराज याच गडावर सुखरूप पोहोचले, तेव्हा तोफांचे आवाज ऐकून बाजीप्रभूंनी देह ठेवला, असं इतिहास सांगतो.