उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
तानाजी मालुसरे यांचा पराक्रम. वर पिठलं-भाकरी आणि कांदाभजी — ट्रेकनंतरचं बक्षीस!
सिंहगडाचं जुनं नाव कोंढाणा. पुरंदरच्या तहात तो मुघलांकडे गेला होता. १६७० मध्ये तानाजी मालुसरे यांनी रात्रीच्या अंधारात कडा चढून गड जिंकला, पण त्या लढाईत त्यांना वीरमरण आलं. 'गड आला पण सिंह गेला' असे उद्गार महाराजांनी काढले आणि गडाचं नाव सिंहगड झालं, अशी परंपरा आहे.
यशवंती नावाच्या घोरपडीला दोर बांधून मावळ्यांनी कडा चढला, ही गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. गडावर तानाजींचं स्मारक, छत्रपती राजाराम महाराजांची समाधी, कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा आणि देव टाकं आहे. लोकमान्य टिळकांचा बंगलाही इथे होता.
पुण्यापासून अगदी जवळ असल्याने हा पुणेकरांचा आठवड्याचा लाडका ट्रेक आहे. गडावरच्या झापांमध्ये मिळणारं पिठलं-भाकरी, कांदाभजी, दही आणि मठ्ठा हे सिंहगडाचं वैशिष्ट्य.
पुण्याजवळचा हा किल्ला शनिवार-रविवारी पुणेकरांनी गजबजलेला असतो. कल्याण दरवाजा, तानाजी मालुसरे यांचं स्मारक, देव टाकं आणि दूरदर्शनचा मनोरा ही ठिकाणं. वर मिळणारं पिठलं-भाकरी, कांदाभजी आणि मठ्ठा हा ट्रेकचा खरा आनंद!
कसं जायचं
पुण्याहून सुमारे ३५ किमी. आतकरवाडीतून पायवाटेने दीड-दोन तासांची चढाई; गडाच्या वरपर्यंत गाडीरस्ताही आहे.
उत्तम काळ
जुलै ते फेब्रुवारी; पावसाळ्यातला सिंहगड धुक्यात हरवलेला असतो
टीप
शनिवार-रविवारी प्रचंड गर्दी आणि वाहनांच्या रांगा असतात — शक्य तर आठवड्याच्या दिवशी सकाळी लवकर जा.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.