जुन्नर

पुणे · पश्चिम महाराष्ट्र

जुन्नर परिसर इतिहासाचा खजिना आहे. इथेच शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. आणि दोन हजार वर्षांपूर्वी, सातवाहन काळात, जुन्नर हे मोठं व्यापारी केंद्र होतं — कोकणातल्या बंदरांतून देशावर येणारा माल नाणेघाटातून इथे यायचा. नाणेघाटातल्या गुहेत राणी नागनिकेचा प्राचीन ब्राह्मी शिलालेख आहे.

जुन्नरच्या डोंगरांत दोनशेहून अधिक प्राचीन बौद्ध लेणी आहेत. त्यांतल्याच एका लेण्यात लेण्याद्रीचा गिरिजात्मज गणपती आहे — अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती लेण्यात आहे. जवळच ओझरचा विघ्नहर गणपतीही अष्टविनायकांपैकी एक.

पाहण्यासारखं

  • शिवनेरी किल्ला
  • लेण्याद्री — लेण्यांतला अष्टविनायक
  • ओझरचा विघ्नहर
  • नाणेघाट — सातवाहनकालीन व्यापारी मार्ग
  • जुन्नरच्या प्राचीन बौद्ध लेणी

खासियत

मासवडी, पिठलं-भाकरी, ओझरचा प्रसाद

जायचं केव्हा

जुलै ते फेब्रुवारी

कसं जायचं

पुण्याहून नारायणगावमार्गे सुमारे शंभर किलोमीटर.

जवळपास

शिवनेरी, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, भीमाशंकर.

टीप

एका दिवसात शिवनेरी, लेण्याद्री आणि ओझर करता येतात. लेण्याद्रीला सुमारे तीनशे पायऱ्या आहेत.