दिवेआगर

रायगड · कोकण

श्रीवर्धनजवळचं दिवेआगर हे शांत, स्वच्छ किनाऱ्यासाठी आणि नारळी-पोफळीच्या बागांसाठी ओळखलं जातं. गर्दीपासून दूर, घरगुती मुक्कामाची सोय असलेलं हे गाव कुटुंबासोबत निवांत सुट्टीसाठी उत्तम आहे.

१९९७ मध्ये गावातल्या एका बागेत खोदकाम करताना सोन्याचा गणेश मुखवटा सापडला, आणि दिवेआगर देशभर प्रसिद्ध झालं. गावात प्राचीन रूपनारायण मंदिरही आहे. संध्याकाळी किनाऱ्यावरचा सूर्यास्त अविस्मरणीय.

पाहण्यासारखं

  • शांत, लांबलचक किनारा
  • सुवर्ण गणेश मंदिर
  • रूपनारायण मंदिर
  • नारळी-पोफळीच्या बागा

खासियत

उकडीचे मोदक, नारळाच्या वड्या, कोकणी जेवण

जायचं केव्हा

ऑक्टोबर ते मे

कसं जायचं

मुंबई-गोवा महामार्गावरून माणगावमार्गे, किंवा दिघी-आगरदांडा जेट्टीवरून.

जवळपास

हरिहरेश्वर-श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, काशीद.

टीप

घरगुती होमस्टेमध्ये राहा — कोकणी जेवणाची खरी चव तिथेच मिळते.