उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
पेशव्यांची राजधानी, 'विद्येचं माहेरघर' आणि आजचं आयटी शहर — पुणे परंपरा आणि आधुनिकता दोन्ही जपतं. शनिवारवाडा हे पेशवाईचं प्रतीक, तर लाल महाल शिवरायांच्या बालपणाच्या आठवणी जागवतो.
महात्मा गांधी नजरकैदेत होते तो आगाखान पॅलेस, गणेशोत्सवात लाखोंची गर्दी खेचणारा दगडूशेठ हलवाई गणपती, एका व्यक्तीने जमवलेलं राजा दिनकर केळकर संग्रहालय, आणि शहराचं विहंगम दृश्य दाखवणारी पर्वती टेकडी — पुण्यात पाहण्यासारखं खूप आहे. आणि हो, पुणेरी पाट्या वाचायला विसरू नका!
मुळा-मुठा नद्यांच्या संगमावरचं पुणे सामाजिक सुधारणांचं केंद्र होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी इथे मुलींची शाळा सुरू केली; लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी कर्वे यांचं कार्यक्षेत्रही पुणेच. फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या संस्थांमुळे शहराला 'विद्येचं माहेरघर' म्हटलं जातं.
आठव्या शतकातलं खडकात कोरलेलं पाताळेश्वर लेणं, विश्रामबाग वाडा आणि तुळशीबागेची बाजारपेठ ही जुन्या पुण्याची ओळख. डिसेंबरमधला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आणि आषाढी वारीत शहरातून जाणाऱ्या पालख्या हे पुण्याचे मोठे सांस्कृतिक सोहळे.
पाहण्यासारखं
शनिवारवाडा
आगाखान पॅलेस
दगडूशेठ हलवाई गणपती
राजा दिनकर केळकर संग्रहालय
पर्वती टेकडी
जवळचा सिंहगड
खासियत
मिसळ, बाकरवडी, मस्तानी, अमृततुल्य चहा
जायचं केव्हा
वर्षभर (पावसाळा आणि हिवाळा उत्तम)
कसं जायचं
विमान, रेल्वे आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने उत्तम जोडलेलं.