उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मधोमध असलेलं भिलार हे भारतातलं पहिलं 'पुस्तकांचं गाव'. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने २०१७ मध्ये हा उपक्रम सुरू केला. गावातल्या अनेक घरांत, मंदिरांत आणि शाळेत वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचकांसाठी ठेवलेली आहेत.
कविता, कादंबऱ्या, इतिहास, विज्ञान, बालसाहित्य, संतसाहित्य — प्रत्येक घराचा विषय वेगळा. कोणीही येऊन मोफत वाचू शकतं. आणि सोबत भिलारच्या शेतांतली ताजी स्ट्रॉबेरी!
पाहण्यासारखं
घराघरांतली पुस्तकांची दालनं
पुस्तकांची चित्रं रंगवलेल्या भिंती
स्ट्रॉबेरीची शेतं
पाचगणीचं टेबल लँड जवळच
खासियत
स्ट्रॉबेरी विथ क्रीम, जाम, मलबेरी
जायचं केव्हा
ऑक्टोबर ते मे
कसं जायचं
पुण्याहून वाईमार्गे पाचगणी, आणि तिथून काही किलोमीटर.
जवळपास
महाबळेश्वर-पाचगणी, वाई, प्रतापगड.
टीप
पुस्तकं तिथेच वाचायची असतात — सोबत न्यायची नाहीत. एखाद्या घरमालकाशी गप्पा मारा — ते आवडीने गावाची गोष्ट सांगतात.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.