उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
माथेरान हे आशियातलं गाड्या-मोटारी नसलेलं एकमेव हिल स्टेशन मानलं जातं. गावाच्या वेशीनंतर पुढे फक्त पायी, घोड्यावर, किंवा हातरिक्षाने फिरायचं! त्यामुळे इथे हॉर्नचा आवाज नाही, धूर नाही — फक्त पक्ष्यांची किलबिल आणि लाल मातीच्या वाटा.
१८५० च्या सुमारास ब्रिटिश अधिकारी ह्यू मॅलेट यांनी हे ठिकाण 'शोधलं', आणि मुंबईकरांचं उन्हाळी विश्रांतिस्थान बनलं. १९०७ मध्ये आदमजी पीरभॉय यांनी नेरळहून माथेरानपर्यंत छोटी 'टॉय ट्रेन' सुरू केली — डोंगरांतून वळणं घेत जाणारा हा प्रवास आजही मुलांचा आवडता आहे.
पाहण्यासारखं
नेरळ-माथेरान 'टॉय ट्रेन'
इको पॉइंट, लुईसा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट
शार्लोट तलाव
लाल मातीच्या वाटांवर घोडेस्वारी
वन ट्री हिल
खासियत
चिक्की, फज, मध
जायचं केव्हा
ऑक्टोबर ते मे; पावसाळ्यात धुकं आणि धबधबे
कसं जायचं
मुंबईहून लोकलने नेरळ; तिथून टॉय ट्रेन (पावसाळ्यात बंद असू शकते) किंवा टॅक्सीने दस्तुरी नाक्यापर्यंत, पुढे पायी किंवा घोड्यावर.
जवळपास
कर्जत, प्रबळगड-कलावंतीण, लोणावळा-खंडाळा.
टीप
प्रवेश कर भरावा लागतो. घोडेवाल्यांशी दर आधी ठरवा. माकडांपासून खाऊ सांभाळा!
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.