उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठी मार्कंडेश्वराचा प्राचीन मंदिरसमूह आहे. इथली दगडी मंदिरं त्यांच्या बारीक कोरीव शिल्पांमुळे 'विदर्भाचं खजुराहो' म्हणून ओळखली जातात. मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, अप्सरा, प्राणी आणि दैनंदिन जीवनाची सुंदर शिल्पं आहेत.
हा परिसर मार्कंडेय ऋषींशी जोडलेला मानला जातो. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते, आणि वैनगंगेच्या पात्रात भाविक स्नान करतात. काळाच्या ओघात काही मंदिरांची पडझड झाली असून भारतीय पुरातत्त्व विभाग त्यांची दुरुस्ती करत आहे.
पाहण्यासारखं
मार्कंडेश्वर मंदिरसमूह
वैनगंगेच्या काठावरची कोरीव शिल्पं
महाशिवरात्रीची मोठी यात्रा
खासियत
स्थानिक आदिवासी पदार्थ, विदर्भी जेवण
जायचं केव्हा
ऑक्टोबर ते मार्च; महाशिवरात्री
कसं जायचं
चंद्रपूरहून सुमारे ऐंशी किलोमीटर, गडचिरोलीहून सुमारे पन्नास.
जवळपास
आनंदवन-हेमलकसा, चंद्रपूर, ताडोबा.
टीप
मंदिरांच्या शिल्पांना हात लावू नका, त्यांवर चढू नका. सोबत पाणी आणि खाणं न्या — परिसरात सोयी मर्यादित आहेत.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.