उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
नांदेड जिल्ह्यातलं माहूर हे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक — रेणुका मातेचं — पूर्ण पीठ मानलं जातं. रेणुका माता ही परशुरामांची आई. डोंगरावरच्या मंदिरात देवीचा फक्त मुखवटा आहे — ते इथलं वैशिष्ट्य.
माहूर हे दत्तात्रयांचं जन्मस्थान मानलं जातं, आणि जवळच्या डोंगरावर 'दत्त शिखर' आणि अनसूया मातेचं मंदिर आहे. परिसरात प्राचीन माहूरगड किल्ला आणि लेणीही आहेत. घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेला हा परिसर शांत आणि सुंदर आहे.
पाहण्यासारखं
रेणुका माता मंदिर — शक्तिपीठ
दत्त शिखर
अनसूया माता मंदिर
माहूरगड किल्ला
खासियत
स्थानिक प्रसाद, विदर्भ-मराठवाडी जेवण
जायचं केव्हा
ऑक्टोबर ते मार्च; नवरात्र आणि दत्त जयंती
कसं जायचं
नांदेडहून सुमारे एकशे तीस किलोमीटर; किनवट रेल्वे स्टेशन जवळचं.
जवळपास
नांदेड, उनकेश्वर गरम पाण्याचे झरे.
टीप
सगळी मंदिरं वेगवेगळ्या डोंगरांवर आहेत — पूर्ण दिवसाचं नियोजन करा.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.