उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
कृष्णा नदीच्या काठावरचं वाई हे घाटांचं आणि मंदिरांचं गाव. पेशवेकाळात विद्वानांचं केंद्र असलेल्या वाईला 'दक्षिण काशी' असंही म्हटलं जातं.
कृष्णाकाठच्या दगडी घाटांवर ओळीने मंदिरं आहेत; त्यातला भव्य ढोल्या गणपती प्रसिद्ध आहे. जवळच्या मेणवलीत नाना फडणवीसांचा वाडा आणि नदीकाठचा घाट आहे — अनेक मराठी-हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण इथे झालं आहे. धोम धरणाचा परिसर निवांत फिरण्यासाठी छान आहे.
पाहण्यासारखं
कृष्णाकाठचे सुंदर घाट आणि मंदिरं
ढोल्या गणपती
मेणवलीचा नाना फडणवीसांचा वाडा
जवळचं धोम धरण
खासियत
घरगुती मराठी जेवण
जायचं केव्हा
ऑक्टोबर ते मार्च
कसं जायचं
पुण्याहून साधारण नव्वद किलोमीटर; महाबळेश्वरच्या वाटेवर.
जवळपास
मेणवली, धोम धरण, पाचगणी, महाबळेश्वर.
टीप
सकाळी घाटावर बसून कृष्णेचं शांत रूप पाहा — गर्दी नसताना वाई सगळ्यात सुंदर दिसतं.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.