उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
नाशिकजवळच्या वणी येथे, सात शिखरांच्या डोंगरावर सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे. महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे अर्धं पीठ मानलं जातं (कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं). कड्यात कोरलेली अठरा हातांची, शेंदूरवर्णी देवीची भव्य मूर्ती आहे.
देवीच्या दर्शनासाठी पाचशेहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. आता ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीची सोयही आहे. नवरात्र आणि चैत्र महिन्यात इथे लाखो भाविक येतात.
पाहण्यासारखं
अठरा हातांची सप्तशृंगी देवी
सात शिखरांचा डोंगर
पाचशेहून अधिक पायऱ्या आणि फ्युनिक्युलर ट्रॉली
चैत्र आणि नवरात्र उत्सव
खासियत
प्रसाद, पेढे
जायचं केव्हा
वर्षभर; नवरात्रात मोठा उत्सव
कसं जायचं
नाशिकहून सुमारे साठ किलोमीटर, घाटरस्ता.
जवळपास
नाशिक, त्र्यंबकेश्वर, साल्हेर किल्ला.
टीप
उत्सवाच्या काळात फार गर्दी असते. माकडांपासून प्रसाद आणि सामान सांभाळा.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.