उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
सावित्री नदी समुद्राला मिळते तिथे वसलेलं हरिहरेश्वर 'दक्षिण काशी' म्हणून ओळखलं जातं. डोंगर, समुद्र आणि प्राचीन मंदिर यांचा सुंदर संगम इथे आहे.
मंदिरामागे समुद्राकाठच्या खडकांतून जाणारी प्रदक्षिणा हा एक वेगळाच अनुभव आहे — लाटांनी घडवलेले खडकांचे आकार पाहत चालताना वेळ कसा जातो कळत नाही. जवळचं श्रीवर्धन हे पेशव्यांचं मूळ गाव आणि स्वच्छ, लांबलचक किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
हरिहरेश्वर हे पेशवे घराण्याचं कुलदैवत. मंदिर परिसरात काळभैरव आणि योगेश्वरीचं मंदिरही आहे. श्रीवर्धनमध्ये पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचं जन्मस्थान आणि पेशवे स्मारक आहे. बागमांडल्याहून सावित्री खाडीतून फेरीबोटीने बाणकोटला जाता येतं — तिथे हिम्मतगड (बाणकोट किल्ला) आहे.
पाहण्यासारखं
'दक्षिण काशी' हरिहरेश्वर मंदिर
मंदिरामागची खडकांतली प्रदक्षिणा
श्रीवर्धन — पेशव्यांचं मूळ गाव आणि स्वच्छ किनारा
खासियत
सुपारी, नारळ, उकडीचे मोदक
जायचं केव्हा
ऑक्टोबर ते मार्च
कसं जायचं
माणगाव किंवा म्हसळ्याहून रस्त्याने. मुंबई-पुण्याहून साधारण चार-पाच तास.
जवळपास
दिवेआगर किनारा, बागमांडले फेरी, वेळास.
टीप
खडकांवरची प्रदक्षिणा ओहोटीच्या वेळीच करा; भरतीत लाटा खडकांपर्यंत येतात.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.