नारळी भात

सणाचे पदार्थ · वेळ: ४५ मिनिटे · ४ जण

नारळी पौर्णिमेचं सुगंधी गोड पक्वान्न — तांदूळ, ओलं खोबरं, गूळ, तूप, लवंग आणि केशर.

साहित्य

  • तांदूळ (बासमती किंवा आंबेमोहर) — १ वाटी
  • ओलं खोबरं — १ वाटी
  • गूळ (किसलेला) — पाऊण ते १ वाटी
  • तूप — ३ चमचे
  • लवंगा — ४
  • वेलची पूड — अर्धा चमचा
  • केशर — चिमूटभर
  • काजू, बेदाणे

कृती

  1. तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा.
  2. पातेल्यात तूप गरम करून लवंगा आणि काजू घाला. तांदूळ घालून दोन मिनिटं परता.
  3. दुप्पट गरम पाणी घालून भात मोकळा, जवळजवळ पूर्ण शिजवा.
  4. दुसऱ्या कढईत खोबरं आणि गूळ घालून गूळ वितळेपर्यंत गरम करा.
  5. शिजलेला भात या मिश्रणात घाला, केशर-वेलची घालून हलक्या हाताने मिसळा.
  6. झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिटं वाफ येऊ द्या, म्हणजे गूळ भातात मुरेल. वरून तूप आणि बेदाणे घाला.

टिपा

भात आधीच पूर्ण शिजवला तर गुळात मिसळताना गिच्च होतो — थोडा कमी शिजवा.