उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका नाश्ता — आणि 'बघण्याच्या कार्यक्रमा'चा हक्काचा पदार्थ! पिवळेधमक, मऊ पोहे, त्यात शेंगदाणे, कांदा, कढीपत्ता आणि वर ओलं खोबरं-कोथिंबीर.
साहित्य
जाड पोहे — ३ वाट्या
कांदा — २ (बारीक चिरलेला)
बटाटा — १ (ऐच्छिक, बारीक चौकोनी)
शेंगदाणे — पाव वाटी
हिरव्या मिरच्या — २-३
कढीपत्ता — ८-१०
हळद — अर्धा चमचा
साखर — १ चमचा
लिंबू — १
तेल — ३ चमचे
मोहरी, जिरं, हिंग
ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ
कृती
पोहे चाळणीत घेऊन नळाखाली हलकेच धुवा आणि पाणी निथळू द्या. त्यात मीठ आणि साखर मिसळून दहा मिनिटं ठेवा.
कढईत तेल गरम करून शेंगदाणे तळून बाजूला काढा.
त्याच तेलात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मिरच्या घालून फोडणी करा.
कांदा (आणि बटाटा) घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत परता. हळद घाला.
भिजलेले पोहे आणि शेंगदाणे घालून हलक्या हाताने मिसळा. झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिटं वाफ येऊ द्या.
गॅस बंद करून लिंबू पिळा आणि वरून ओलं खोबरं-कोथिंबीर घालून गरम वाढा.
टिपा
पोहे धुताना फार वेळ पाण्यात ठेवू नका, नाहीतर ते गिच्च होतात.
वरून शेव किंवा डाळिंबाचे दाणे घातले की 'पाहुण्यांचे पोहे' होतात!
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.