वडापाव

नाश्ता · वेळ: ४० मिनिटे · ८ वडे

मुंबईचा 'बर्गर'! हळदीच्या बटाट्याच्या भाजीचा बेसनात बुडवून तळलेला वडा, पावात लसणाची सुकी चटणी आणि हिरवी चटणी, सोबत तळलेली मिरची.

साहित्य

  • बटाटे — ५ मध्यम (उकडलेले)
  • आलं-मिरची-लसूण पेस्ट — २ चमचे
  • हळद — अर्धा चमचा
  • मोहरी, हिंग, कढीपत्ता
  • लिंबू — अर्धं
  • कोथिंबीर, मीठ
  • आवरणासाठी: बेसन — १ वाटी, हळद, तिखट, चिमूटभर खायचा सोडा, मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • लादी पाव — ८
  • लसणाची सुकी चटणी, हिरवी चटणी, तळलेल्या मिरच्या

कृती

  1. उकडलेले बटाटे हाताने ओबडधोबड कुस्करून घ्या.
  2. कढईत थोडं तेल गरम करून मोहरी, हिंग, कढीपत्ता, आलं-मिरची-लसूण पेस्ट घाला, मग हळद.
  3. बटाटे, मीठ घालून नीट मिसळा. लिंबू आणि कोथिंबीर घालून भाजी थंड होऊ द्या. गोळे करा.
  4. बेसनात हळद, तिखट, मीठ, सोडा घालून दाट, गुळगुळीत पीठ भिजवा.
  5. तेल चांगलं गरम करा. बटाट्याचा गोळा बेसनात बुडवून सोनेरी रंगावर तळा.
  6. पाव मधून कापून आत सुकी आणि हिरवी चटणी लावा, गरम वडा ठेवा आणि तळलेल्या मिरचीसोबत वाढा.

टिपा

भाजी पूर्ण थंड झाल्यावरच गोळे करा, नाहीतर वडे फुटतात.

उरलेल्या बेसनाचे थेंब तळले की होतो 'चुरा' — पावात घातला की अप्रतिम!