उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
कधीही क्षय न होणारा — 'अक्षय' — शुभ दिवस. आंब्यांचा मोसम, चैत्रगौरीची सांगता आणि पाण्याच्या माठाचं दान.
सणाची ओळख
वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. 'अक्षय' म्हणजे कधीही न संपणारं. या दिवशी केलेलं दान, पुण्य आणि चांगलं काम अक्षय राहतं, अशी श्रद्धा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मानला जातो, म्हणून सोनं खरेदी, गृहप्रवेश, नवे उपक्रम यांची सुरुवात या दिवशी केली जाते.
महाराष्ट्रात या दिवशी चैत्र महिन्यात सुरू झालेल्या चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाची सांगता होते. उन्हाळ्याच्या भर दुपारी आंबेडाळ आणि कैरीचं पन्हं देऊन सुवासिनी एकमेकींना निरोप देतात.
आंब्याची सुरुवात
अनेक मराठी घरांमध्ये अक्षय्य तृतीयेपर्यंत आंबा खाल्ला जात नाही, आणि या दिवशी देवाला आणि पितरांना आंब्याचा नैवेद्य दाखवून मगच मोसमातला पहिला आंबा खाल्ला जातो. त्यामुळे लहान मुलांसाठी हा दिवस 'आमरस-पुरीचा दिवस' म्हणूनच लक्षात राहतो!
या दिवशी आमरस-पुरी, कैरीची डाळ, पन्हं आणि कुरडया-पापड असं उन्हाळी जेवण बनतं.
उदककुंभ दान — पाण्याचा माठ
उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी देणं हे मोठं पुण्य मानलं जातं. म्हणून अक्षय्य तृतीयेला मातीचा नवा माठ पाण्याने भरून त्यावर आंबा किंवा खरबूज ठेवून दान करण्याची प्रथा आहे. पितरांच्या स्मरणार्थही हे दान केलं जातं.
आजच्या काळात या प्रथेचा सुंदर अर्थ घेता येईल — सोसायटीच्या गेटवर वॉचमन, डिलिव्हरी करणारे, रस्त्यावरचे कष्टकरी यांच्यासाठी पाण्याचा माठ ठेवा, किंवा गॅलरीत पक्ष्यांसाठी पाण्याची वाटी. हेच खरं 'अक्षय' दान!
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.