उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
वर्षातलं सगळ्यात तेजस्वी चांदणं, आटवलेलं मसाला दूध आणि रात्रभर गप्पा — 'को जागर्ति?'
सणाची ओळख
आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. पावसाळा संपलेला असतो, आकाश स्वच्छ असतं, आणि या रात्रीचं चांदणं वर्षातलं सगळ्यात सुंदर मानलं जातं.
आख्यायिकेनुसार या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि विचारते — 'को जागर्ति?' म्हणजे 'कोण जागं आहे?' जो जागा असतो, त्याच्यावर ती प्रसन्न होते. म्हणून या रात्री जागरण करण्याची प्रथा आहे — आणि त्या नावावरूनच 'कोजागिरी' हा शब्द आला.
मसाला दूध
कोजागिरीचं मुख्य आकर्षण म्हणजे मसाला दूध. दूध मंद आचेवर आटवून त्यात साखर, वेलची, जायफळ, केशर आणि बदाम-पिस्त्याचे काप घातले जातात. मग ते दूध चांदण्यात ठेवलं जातं, आणि त्यात चंद्राचं प्रतिबिंब पाहिल्यानंतर सगळे मिळून पितात.
सोसायट्यांच्या गच्च्यांवर, बागांमध्ये या रात्री गाण्यांच्या मैफली, अंताक्षरी, कोडी आणि गप्पांचे फड रंगतात. मित्रमंडळींसोबत रात्र जागवण्याचा हा सगळ्यात गोड बहाणा!
अश्विनी — ज्येष्ठ अपत्याचं औक्षण
महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये कोजागिरीला घरातल्या पहिल्या मुलाचं किंवा मुलीचं — ज्येष्ठ अपत्याचं — औक्षण केलं जातं. आई त्याला ओवाळते आणि भेटवस्तू देते. घरातल्या मोठ्या भावंडाच्या जबाबदारीची आणि प्रेमाची ही आठवण.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.