उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
१९ फेब्रुवारी (तसेच तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव — शिवनेरीवर सोहळा, पालख्या, पोवाडे, मिरवणुका आणि गडकिल्ल्यांची स्वच्छता.
शिवरायांचा जन्मोत्सव
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराष्ट्र शासनाच्या तारखेनुसार शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी होते, तर अनेक ठिकाणी ती पारंपरिक तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेलाही साजरी होते. दोन्ही दिवशी महाराष्ट्रभर भगव्या ध्वजांनी आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने वातावरण भारून जातं.
शिवनेरी किल्ल्यावर या दिवशी मुख्य शासकीय सोहळा होतो — शिवजन्माचा पाळणा, पालखी आणि अभिवादन.
कसा साजरा होतो
पहाटे गडांवरून शिवज्योत आणली जाते — तरुण धावत, ज्योत हातात घेऊन आपल्या गावापर्यंत आणतात.
गावात आणि शहरात शिवरायांच्या प्रतिमेची पालखी, ढोल-ताशे, लेझीम आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं.
शाळांमध्ये भाषणं, नाटकं आणि शिवचरित्रावर प्रश्नमंजुषा.
अनेक संस्था या दिवशी गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवतात.
खरं शिवस्मरण
शिवरायांनी स्वराज्य उभं करताना शेतकऱ्यांची काळजी घेतली, स्त्रियांचा सन्मान राखला, आणि सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेतलं. त्यांचे किल्ले आज आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. शिवजयंतीला गडांवर कचरा न टाकणं, ऐतिहासिक वास्तूंवर नावं न कोरणं, आणि त्यांच्या विचारांप्रमाणे वागणं — हीच त्यांना खरी मानवंदना.
शाळेत किंवा सोसायटीत शिवजयंतीसाठी नाटक हवं असेल तर 'शिवनेरीवरची एक रात्र' हे पूर्ण नाटक चम्मतगवर आहे.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.