उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
बहिणाबाई जळगावजवळच्या आसोद्याच्या. लहान वयात लग्न, तरुणपणीच वैधव्य, शेतीची जबाबदारी — कष्टाचं आयुष्य. शाळेत त्या कधी गेल्या नाहीत.
पण शेतात काम करताना, जात्यावर दळताना त्यांच्या तोंडून ओव्या येत — खानदेशी (अहिराणी मिश्रित) बोलीत. संसार, निसर्ग, माणसाचं मन, मरण यांवर इतकं खोल बोलणारी ही कविता होती.
मुलाने जपलेली गाणी
त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी स्वतः कवी होते. आईच्या ओव्या त्यांनी लिहून ठेवल्या. बहिणाबाईंच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांनी त्या वाचल्या आणि म्हणाले — हे तर बावनकशी सोनं आहे!
अत्र्यांच्या पुढाकाराने 'बहिणाबाईंची गाणी' प्रकाशित झाली आणि खानदेशच्या शेतातली कविता महाराष्ट्रभर पोचली.
साध्या शब्दांत मोठं शहाणपण
'अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर' — संसाराचं इतकं नेमकं वर्णन क्वचितच सापडतं.
मन कसं चंचल आहे, हे सांगताना त्या उभ्या पिकात घुसणाऱ्या गुराचा दाखला देतात. शेतकरी स्त्रीच्या नजरेतून जगाकडे पाहणारी ही कविता आजही पाठ्यपुस्तकांत आहे.
वाणी
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर,
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर.
प्रमुख रचना
बहिणाबाईंची गाणी
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.