उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
'श्रावणमासी हर्ष मानसी' आणि 'फुलराणी' लिहिणारे, निसर्गाला कवितेत जिवंत करणारे आणि अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी हरपलेले कवी.
त्र्यंबक बापूजी ठोमरे
बालकवींचं मूळ नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे. खानदेशातल्या धरणगावचे. अगदी लहान वयात त्यांनी एका कविसंमेलनात कविता म्हटली आणि श्रोते इतके भारावले की त्यांना 'बालकवी' ही पदवी मिळाली — तेच नाव पुढे कायमचं झालं.
त्यांचं आयुष्य अस्थिर होतं; मनातलं दुःख ते निसर्गात विसरत.
निसर्गाचा कवी
पावसाळ्यातली हिरवळ, ऊन-पावसाचा खेळ, फुलं, झरे, पाखरं — बालकवींच्या कवितेत निसर्ग फक्त देखावा नसतो, तो बोलतो, हसतो, लाजतो. 'फुलराणी' मध्ये एक लहानसं फूल आणि सूर्यकिरणाचं लग्न लागतं!
'औदुंबर' ही अवघ्या काही ओळींची कविता — नदीकाठी पाय सोडून बसलेला औदुंबर — मराठीतली अत्यंत गूढ आणि सुंदर कविता मानली जाते.
अकाली मृत्यू
१९१८ मध्ये जळगावजवळ रेल्वे अपघातात वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी बालकवींचं निधन झालं. इतक्या लहान आयुष्यात त्यांनी मराठी निसर्गकवितेला कायमचा रंग दिला.
आजही श्रावण आला की प्रत्येक मराठी माणसाच्या ओठी त्यांचीच ओळ येते.
'फुलराणी' मधून
हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे;
प्रमुख रचना
श्रावणमास, फुलराणी, औदुंबर, निर्झरास
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.