उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
लग्नमंडपातून 'सावधान' ऐकून निघून गेलेले, बलोपासनेचा संदेश देणारे, मारुतीची मंदिरं उभारणारे आणि 'मनाचे श्लोक' लिहिणारे समर्थ.
'सावधान' आणि बारा वर्षांची तपश्चर्या
रामदासांचं मूळ नाव नारायण. जालना जिल्ह्यातल्या जांब गावचे. बाराव्या वर्षी लग्नमंडपात भटजींनी 'शुभमंगल सावधान' म्हणताच ते सावध झाले आणि मंडपातून पळून गेले, अशी प्रसिद्ध कथा आहे.
नाशिकजवळ टाकळी येथे त्यांनी बारा वर्षं साधना केली, आणि मग बारा वर्षं भारतभर फिरून लोकांची स्थिती पाहिली. परकीय सत्तेखाली दबलेला, दुबळा समाज पाहून त्यांनी शक्ती आणि शहाणपण दोन्हीचा संदेश दिला.
मारुती आणि बलोपासना
'शरीर बलवान हवं' म्हणून रामदासांनी गावोगावी मारुतीची मंदिरं आणि आखाडे उभारले. सातारा-सांगली-कोल्हापूर भागातल्या त्यांनी स्थापन केलेल्या मंदिरांना 'अकरा मारुती' म्हणतात.
'सुखकर्ता दुखहर्ता' ही गणपतीची आरती रामदासांची मानली जाते — घराघरात रोज म्हटली जाणारी ही रचना.
दासबोध आणि मनाचे श्लोक
दासबोध हा व्यवहार आणि अध्यात्म दोन्ही शिकवणारा ग्रंथ — मूर्ख कोण, शहाणा कोण, नेता कसा असावा, लेखन कसं करावं, इथपर्यंत सगळं त्यात आहे.
'मनाचे श्लोक' म्हणजे स्वतःच्या मनाशी केलेला संवाद. भुजंगप्रयात वृत्तातले हे श्लोक लहान मुलं सहज पाठ करतात. साताऱ्याजवळच्या सज्जनगडावर त्यांची समाधी आहे.
मनाच्या श्लोकातून
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तूंचि शोधूनि पाहें॥
प्रमुख रचना
दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टकं, आरत्या
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.