आरती ज्ञानराजा

संत ज्ञानेश्वर · रचना: रामा जनार्दन

लोपलें ज्ञान जगीं। हित नेणती कोणी।
अवतार पांडुरंग। नाम ठेविलें ज्ञानी॥

आरती ज्ञानराजा। महाकैवल्यतेजा।
सेविती साधुसंत। मनु वेधला माझा॥

कनकाचें ताट करीं। उभ्या गोपिका नारी।
नारद तुंबर हो। साम गायन करी॥

प्रगट गुह्य बोले। विश्व ब्रह्मचि केलें।
रामा जनार्दनीं। पायीं मस्तक ठेविलें॥

केव्हा म्हणतात

आळंदीची कार्तिकी वारी, ज्ञानेश्वरी पारायण

संत ज्ञानेश्वरांची आरती. शेवटच्या ओळीतलं 'रामा जनार्दनी' हे रचनाकाराचं नाव.