दुर्गे दुर्घट भारी

देवी · रचना: संत नरहरी (प्रचलित परंपरेनुसार)

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारीं जन्ममरणाते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडिले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।
क्लेशापासूनि सोडवी तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥

केव्हा म्हणतात

नवरात्र, देवीची पूजा, गणेशोत्सवातल्या आरत्या

संसारातल्या संकटांतून सोडवणाऱ्या महिषासुरमर्दिनी देवीची आरती.