लवथवती विक्राळा

शंकर · रचना: समर्थ रामदास

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केलें।
त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिलें।
तें त्वां असुरपणें प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी॥

मंत्र

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि॥

केव्हा म्हणतात

महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, गणेशोत्सवातल्या आरत्या

समुद्रमंथनातून आलेलं हलाहल प्राशन करून नीलकंठ झालेल्या शंकराचं वर्णन.