सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी

मारुती · रचना: समर्थ रामदास

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी।
कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी॥

जय देव जय देव जय श्रीहनुमंता।
तुमचेनि प्रसादे न भी कृतांता॥

दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द।
थरथरला धरणीधर मानिला खेद।
कडाडिले पर्वत उड्डुगण उच्छेद।
रामी रामदासा शक्तीचा शोध॥

केव्हा म्हणतात

हनुमान जयंती, शनिवार

लंकेकडे झेपावलेल्या हनुमंताच्या प्रचंड शक्तीचं वर्णन — बलोपासनेचा संदेश देणाऱ्या समर्थांची रचना.