सुखकर्ता दुखहर्ता

गणपती · रचना: समर्थ रामदास

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना॥

केव्हा म्हणतात

गणेशोत्सव, संकष्टी, रोजची पूजा

महाराष्ट्रात सर्वांत जास्त म्हटली जाणारी आरती. मोरगावच्या मयूरेश्वराचं दर्शन घेतल्यावर समर्थ रामदासांनी ही आरती रचली, अशी परंपरा आहे.