आरती तुकारामा

संत तुकाराम · रचना: रामेश्वर भट्ट (परंपरेनुसार)

राघवे सागरांत। पाषाण तारियेले।
तैसे हे तुकोबाचे। अभंग उदकीं रक्षिले॥

आरती तुकारामा। स्वामी सद्गुरुधामा।
सच्चिदानंद मूर्ती। पाय दाखवीं आम्हां॥

तुकिता तुलनेसी। ब्रह्म तुकासि आलें।
म्हणोनि रामेश्वरें। चरणीं मस्तक ठेविलें॥

केव्हा म्हणतात

तुकाराम बीज, देहूची वारी

इंद्रायणीत बुडवलेले अभंग पाण्यावर तरले, या आख्यायिकेचा उल्लेख असलेली आरती. परंपरेनुसार ती तुकारामांचे आधीचे विरोधक रामेश्वर भट्ट यांनी रचली.