येई हो विठ्ठले माझे माउली ये

विठ्ठल · रचना: संत नामदेव

आलिया गेलिया हाती धाडी निरोप।
पंढरपुरी आहे माझा मायबाप॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये।
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे॥

पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला।
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला॥

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी।
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी॥

केव्हा म्हणतात

एकादशी, रोजची पूजा, भजनाचा शेवट

विठ्ठलाला 'माउली' — आई — म्हणून हाक मारणारी, भक्ताच्या ओढीची सुंदर आरती.