बिरबल आणि कावळ्यांची मोजणी

अकबर-बिरबल · वयोगट: ५ ते १० वर्षं

एके दिवशी बादशहा अकबराने बिरबलाला विचारलं, 'आपल्या राज्यात किती कावळे आहेत?' सगळे दरबारी हसू लागले — असं कोणी कसं मोजणार?

बिरबल शांतपणे म्हणाला, 'खाविंद, एकूण नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णव कावळे आहेत.' अकबर म्हणाला, 'आणि मोजले तर कमी-जास्त भरले तर?'

बिरबल हसला, 'कमी भरले तर समजा काही कावळे पाहुणे म्हणून दुसऱ्या राज्यात गेलेत. जास्त भरले, तर दुसऱ्या राज्यातले कावळे आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत!'

अकबर खळखळून हसला आणि बिरबलाला बक्षीस दिलं.

तात्पर्य: अवघड प्रश्नाला हजरजबाबीपणा आणि विनोदाने उत्तर देता येतं.