चिऊ-काऊची गोष्ट

मराठी लोककथा · वयोगट: २ ते ६ वर्षं

एक होता काऊ, एक होती चिऊ. काऊचं घर होतं शेणाचं आणि चिऊचं घर होतं मेणाचं. एके दिवशी जोराचा पाऊस आला आणि काऊचं शेणाचं घर वाहून गेलं.

भिजलेला काऊ चिऊकडे आला. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड!' चिऊ म्हणाली, 'थांब, माझ्या बाळाला न्हाऊ घालते.' काऊ थांबला. पुन्हा हाक मारली. 'थांब, बाळाला तीट लावते.' मग 'बाळाला अंगडं-टोपडं घालते', मग 'बाळाला पाळण्यात झोपवते'.

शेवटी चिऊने दार उघडलं, कुडकुडणाऱ्या काऊला आत घेतलं, ऊबदार जागा दिली आणि गरम गरम खाऊ दिला. काऊने चिऊचे मनापासून आभार मानले.

तात्पर्य: मजबूत घर आणि मोठं मन — दोन्ही असले की संकटात दुसऱ्यालाही आधार देता येतो.