कावळा आणि कोल्हा

इसापनीती · वयोगट: ३ ते ७ वर्षं

एका कावळ्याला एक पुरी मिळाली. तो ती चोचीत धरून झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. खाली एका कोल्ह्याने ती पुरी पाहिली आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं.

कोल्हा गोड आवाजात म्हणाला, 'कावळेदादा, किती सुंदर दिसता तुम्ही! तुमचे पंख किती चमकदार! तुमचा आवाजही असाच गोड असेल. एक गाणं म्हणा ना!'

स्तुती ऐकून कावळा फुगला. त्याने गाणं म्हणायला चोच उघडली — 'काव काव!' — आणि पुरी खाली पडली. कोल्ह्याने ती उचलली आणि हसत निघून गेला.

तात्पर्य: खोट्या स्तुतीला भुलू नये. गोड बोलणारा प्रत्येक जण मित्र नसतो.