उखाण्यांसाठी उखाणे विभाग पाहा — "मंगळागौर / हळदीकुंकू" प्रकार निवडा.
गंमत रात्र — खेळ
जेवण झालं, सगळे जमले, आता काय? मोबाईल बाजूला ठेवा (हा सोडून!) आणि हे खेळ खेळा.
डम्ब शराज
एकाने चिठ्ठी पाहायची (इतरांना दाखवू नका!) आणि न बोलता अभिनय करायचा. गटाने ओळखायचे.
चिठ्ठी उचलण्यासाठी खालचे बटण दाबा
०:००
गट अ०
गट ब०
हौजी (तंबोला) — मराठी हाका
तिकिटे इथून छापा. आकडे इथून काढा — प्रत्येक आकड्याला मराठी नाव आणि मजेदार हाक!
?
सुरू करायला बटण दाबा
काढलेले आकडे: ० / ९०
एक मिनिट खेळ — भिशी, किटी, सोसायटी आणि वाढदिवस
प्रत्येक खेळाला फक्त एक मिनिट आणि घरातलंच साहित्य. यजमानांसाठी ही यादी छापूनही घेता येते.
नाव-गाव-फळ-फूल
शाळेतला लाडका खेळ! अक्षर फिरवा, टायमर लावा आणि त्या अक्षराने सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी आणि वस्तू लिहा. वेगळं उत्तर — १० गुण, सारखं उत्तर — ५ गुण.
श्रावण नावाचा एक मुलगा होता. त्याचे आई-वडील म्हातारे आणि अंध होते. त्यांची तीर्थयात्रेची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावणाने एक कावड बनवली — दोन टोकांना दोन टोपल्या — आणि आई-वडिलांना त्यात बसवून खांद्यावरून यात्रेला निघाला.
एका संध्याकाळी आई-वडिलांना तहान लागली. श्रावण पाणी आणायला नदीकाठी गेला. त्याच वेळी जंगलात अयोध्येचे राजा दशरथ शिकारीला आले होते. घड्यात पाणी भरण्याचा आवाज ऐकून त्यांना वाटलं, एखादा प्राणी पाणी पितोय — आणि त्यांनी आवाजाच्या दिशेने बाण सोडला.
बाण श्रावणाला लागला. दशरथ धावत गेले. मरताना श्रावणाने एवढंच सांगितलं — 'माझ्या तहानलेल्या आई-वडिलांना पाणी द्या.' दशरथांनी पाणी नेलं आणि घडलेलं सांगितलं. आई-वडिलांच्या दुःखाला पारावार उरला नाही. आजही आई-वडिलांची सेवा करणाऱ्या मुलाला 'श्रावणबाळ' म्हणतात.
तात्पर्य: आई-वडिलांची सेवा हे सर्वांत मोठं कर्तव्य. आणि कोणतीही कृती करण्याआधी नीट खात्री करावी.
नाटकं
शाळेचं स्नेहसंमेलन, सोसायटीचा कार्यक्रम, गणेशोत्सवाचा मंच — तयार लहान नाटकं. पात्रं, साहित्य आणि संपूर्ण संहिता. वाचा, छापा किंवा PDF डाउनलोड करा.
मुलांसाठी
झोपताना सांगायच्या गोष्टी, बडबडगीतं आणि अंगाई — आजीच्या पोतडीतून.
पंचतंत्र, जातक, इसापनीती, अकबर-बिरबल आणि मराठी लोककथा — प्रत्येक गोष्टीच्या शेवटी तात्पर्य.
पारंपरिक बडबडगीतं आणि चम्मतगची नवी गीतं — लहानग्यांसोबत टाळ्या वाजवत म्हणा.
बाळाला झोपवताना हळुवार म्हणायच्या अंगाई.
पार्टी छापा
सोसायटीची दिवाळी पार्टी, भिशी, किटी, वाढदिवस, हळदीकुंकू, गणपती — तयार पत्रके. उघडा, कार्यक्रमाचं नाव लिहा आणि प्रिंट करा किंवा PDF डाउनलोड करा.
PDF कशी बनवायची?
पत्रक उघडा आणि वर कार्यक्रमाचं नाव लिहा (उदा. "साईकृपा सोसायटी — दिवाळी पार्टी").
PDF डाउनलोड दाबा — फाइल थेट डाउनलोड होईल.
किंवा प्रिंट दाबा आणि प्रिंटरऐवजी "Save as PDF" निवडा — सगळ्यात सुबक PDF अशी मिळते.
A4 कागद वापरा. चिठ्ठ्या आणि कार्ड्स ठिपक्यांच्या रेषेवर कापा.