सोन्याचं अंडं देणारी कोंबडी

इसापनीती · वयोगट: ४ ते ९ वर्षं

एका शेतकऱ्याकडे एक जादूची कोंबडी होती. ती रोज एक सोन्याचं अंडं द्यायची. शेतकरी हळूहळू श्रीमंत होऊ लागला.

पण त्याला लवकर आणखी श्रीमंत व्हायचं होतं. तो विचार करू लागला — 'रोज एकच अंडं? कोंबडीच्या पोटात तर सोन्याचा खजिनाच असेल! सगळं एकदम काढून घेतलं तर?'

लोभाने आंधळ्या झालेल्या शेतकऱ्याने कोंबडीला कापलं. पण आत काहीच नव्हतं! रोज मिळणारं सोन्याचं अंडंही आता बंद झालं. शेतकरी हात चोळत बसला.

तात्पर्य: अति लोभ नुकसानीला कारण ठरतो. जे मिळतंय त्यात समाधान मानावं.